Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारतीय बौध्द महासभेतर्फे राजगृहावरील हल्याचा तीव्र निषेध

भारतीय बौध्द महासभेतर्फे राजगृहावरील हल्याचा तीव्र निषेध

अहमदनगर, 13 जुलै (हिं.स.):- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवासस्थान असलेल्या राजगृहावर झालेल्या हल्ल्याचा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्या लयासमोर निषेध नोंदवि ण्यात आला. तर आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान हे एक पवित्र स्थान असून, ज्या मानवाने भारताची राज्यघटना लिहिली आणि राजगुरू हे पुस्तकाचे एक संग्रहालय बांधले. हे राजगृह त्यांचे निवासस्थान होते.राजगृह ही संपूर्ण भारत देशात व जगामध्ये आंबेडकरी जनतेची अस्मिता आहे. राजगृहावर झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी करावी, हल्लेखोरांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, हल्लेखोरांना कठोर शिक्षा करून त्यांच्यावर देशद्रोहाचा व समाजामध्ये दंगा पसरवण्याचा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
हिंदुस्थान समाचार
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi