Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

बीड - अधिक मासानिमित्त अंबानगरीतील मंदिरात भाविकांची मांदियाळी

बीड, 30 मे, (हिं.स.)। हिंदू धर्मात अधिक मास व श्रावण हा सर्वात पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. सध्या अधिक मास सुरू असल्याने शहर व परिसरातील अनेक मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल जोरात सुरू आहे.

श्री योगेश्वरी देवी, मुकुंदराज स्वामी महाराज मंदिररासह इतरही मंदिरात भाविकांची मांदियाळी जमत आहे. बहुतांश मंदिरात यानिमित्त अन्नदान केले जात आहे. तीन वर्षानंतर येणाऱ्या अधिक महिन्याचा आनंद काही वेगळाच असतो.

सध्या अधिक मास सुरू असल्याने श्री योगेश्वरी देवी मंदिर, मुकुंदराज स्वामी महाराज मंदिर, धाकटे देवघरासह शहरी, ग्रामीण भागातील मंदिरात धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल सुरू आहे. अंबाजोगाई परिसरातील बुट्टेनाथ, घाट नागनाथ, चनईचा खोपरनाथ, सकलेश्वर, अमृतेश्वर, खोलेश्वर, काशी विश्वेश्वर, केदारेश्वर, महादेव मंदीर, संतकवी दासोपंत समाधी परिसर, रेणुका देवी मंदीर, डोंगर तुकाई मंदीर, भैरवनाथ तसेच काजळ तोंडी परिसर, जोगाई माहेर, योगेश्वरी देवी, देवघर मध्ये भक्तगण मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत.

धाकटे देवघर दत्त मंदीर येथे श्री गजानन महाराज पारायण सोहळ्याचे तर श्री मुकुंदराज स्वामी संस्थानचे अध्यक्ष किसन महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक मासानिमित्त महिनाभर अखंड हरिनाम सप्ताह तुकाराम गाथा पारायण, एकनाथ भागवत पारायण, व ग्रंथराज ज्ञानेश्वन पारायण, तसेच दररोज कीर्तन, भजन अन्नदात्याच्या वतीने अयोजन करण्या आले आहे.

महाराष्ट्राचे शक्तीपीठ असलेल्य योगेश्वरी देवी मंदिराची महती सर्वद्र असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची तोबा गर्दी होत आहे. भाविक दर्शनाबरोबरच हत्तीखाण लेणी, बाराखांबी मंदिर पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून जात आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi