Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

बीड - परळी शहरात अधिक मासानिमित्त इष्टलिंग महापूजा सोहळा

बीड, 30 मे, (हिं.स.)। अधिक मासानिमित्त परळीत इष्टलिंग महापूजा, धर्मसभा आणि 'मार्ग हा मुक्तीचा' ग्रंथाचे विमोचन करण्यात आले. यावेळी काशी पीठाचे जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांची पवित्र उपस्थिती होती.

परळीतील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी गुरुवारी परळीत दाखल झाले. यावेळी त्यांच्यासमवेत सोनपेठचे नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, सदाशिव शिवाचार्य महाराज वेळापूरकर यांच्यासह अन्य शिवाचार्य उपस्थित होते. वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. वीरशैव लिंगायत

समाजाच्या वैद्यनाथ प्रवचन मंडपात इष्टलिंग महापूजा, धर्मसभा आणि 'मार्ग हा मुक्तीचा' या ग्रंथाचे विमोचन करण्यात आले. यावेळी धर्मसभेत काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी म्हणाले की, 'इष्टलिंग पूजा करणाऱ्या भक्ताला अपेक्षित फलप्राप्ती मिळते. प्रत्येकाने दररोज स्नानानंतर वीरशैव बांधवांनी इष्टलिंगाची पूजा करून जल दाखवल्यानंतर भोजन करावे. 'मुक्तीचा मार्ग समजून घेण्यासाठी ग्रंथ वाचन केले पाहिजे.

३० दिवसांत ५० ठिकाणी इष्टलिंग महापूजा

काशी जगद्गुरूंच्या उपस्थितीत राज्यभरात ३० दिवसांत ५० ठिकाणी इष्टलिंग महापूजा, धर्मसभा आणि ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले असून, त्याच मालिकेतील परळीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi