Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बीड - वॉन्टेड विशाल ऊर्फ ममड्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

बीड - वॉन्टेड विशाल ऊर्फ ममड्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

बीड, 22 सप्टेंबर (हिं.स.)। बीड आणि धाराशिव जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यात चोरी, वाटमारी, दरोडा आणि घातक शस्त्र अधिनियम अंतर्गत गंभीर गुन्हे असलेला वॉन्टेड गुन्हेगार विशाल ऊर्फ ममड्या काळे याला केज पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील केज, युसुफवडगाव आणि कळंब पोलिस ठाण्यात गु र नं ३७५/२०२५ भा न्या सं ३०३(२), गु र नं ३७६/२०२५ भा न्या सं ३०३(२), गु र नं ३९८/२०२५ भा न्या सं ३३१(४),३०५(ए), गु र नं ४०८/२०२५ भा न्या सं ३०३(२), गु र नं १९४/२०२६ भा न्या सं ३०३(२), गु र नं ३७५/२०२५ शस्त्र अधिनिय कलम ३,२५ भा न्या सं ३०३(२) आणि म पो अ कलम १३५ नुसार गुन्हे दाखल असल्याने तो केज, युसुफ वडगाव आणि कळंब पोलिसांना हवा होता. परंतु विशाल ऊर्फ ममड्या बालाजी काळे हा अत्यंत चाणाक्ष असल्याने तो पोलिसांना सापडत नव्हता.

,केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधीकारी राहुल सुर्यतळ यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पोलीस फरार सराईत गुन्हेगार विशाल ऊर्फ ममडया बालाजी काळे रा. कन्हेरवाडी ता. कळंब जि. धाराशीव येथे त्याच्या घरी बसलेला आहे. अशी माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या आदेशाने तात्काळ डी.बी. पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, पोलीस उपनिरीक्षक अमीरोद्यीन इनमादार, पोलिस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अंहकारे, पोलिस कॉन्स्टेबल नितीन वारे, राहुल तरकसे, दादाराव देवगुडे यांचे पथक कळंब तालुक्यातील कान्हेरवाडी येथे गेले असता पोलीस पथकास पाहुन विशाल ऊर्फ ममड्या काळे हा पळून जात असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्याला जेरबंद करून मुसक्या आवळल्या. या कामगिरी बद्दल केज पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

केज पोलिसांच्या डी बी पथकाने ही कार्यवाई जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलिस अधीक्षक वेंकटराम आणि पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi