Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
छ. संभाजीनगर - भाजप आ. नारायण कुचे यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या अडचणी

छ. संभाजीनगर - भाजप आ. नारायण कुचे यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या अडचणी

त्रपती संभाजीनगर, 27 ऑगस्ट (हिं.स.)। रोषणगाव येथे शेतकरी संवाद दौऱ्याच्या निमित्ताने शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या विविध अडचणी आणि प्रश्न जाणून घेतले. शेतीची सद्यस्थिती, पिकांचे नुकसान, पाणी, वीज, महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी याबाबत शेतकरी बांधवांशी सविस्तर चर्चा केली.

शेतकऱ्यांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन त्यावर तातडीने योग्य तो मार्ग काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, हीच या संवाद दौऱ्यामागची भूमिका आहे.

यावेळी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या. शासनाच्या योजना, सुविधा आणि मदत पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने व तत्परतेने काम करावे, असेही निर्देश दिले.

या प्रसंगी बदनापूर तहसीलदार हेमंत तायडे, ए.आर. बेरा महावितरणचे शाखा अभियंता पाटील भाजपा तालुका अध्यक्ष भगवान मात्रे, पद्मकर जऱ्हाड, भगवान बारगाजे, राजेंद्र बापू जऱ्हाड, उद्धव काळे, रवीकुमार बोचरे, बाबासाहेब कराळे, विनोद मगरे, पप्पू कुलकर्णी, संतोष वरकड, बद्रीनाथ खरात, अनिल झाल्टे, अजय देशमुख, देबडीवाल पटेल, प्रताप काळे, बाळू भावले, संदीप खरात, राजाभाऊ देशमुख, चंद्रभान गुरखे, सचिन घाडगे यांच्यासह शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi