छत्रपती संभाजीनगर, 31 जुलै, (हिं.स.)। भाजपा, विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भोपाल (मध्यप्रदेश) दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार भगवानदासजी सबनानी यांच्या प्रमुख उपस्थितीत एसआयआर अभियानाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली.
या बैठकीस भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ भागवत कराड, रा्ज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी एसआयआर अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, नियोजन, समन्वय आणि संघटनात्मक बळकटी यांसंदर्भात सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. अभियान अधिक गतिमान व प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक बाबींवर सकारात्मक विचारविनिमय झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis

