Dailyhunt

छ. संभाजीनगर मनपाच्या २२२ पदांसाठी ५६ हजार बेरोजगारांचे अर्ज, त्रुटींमुळे २५ हजार अर्ज अवैध

छत्रपती संभाजीनगर, 02 एप्रिल (हिं.स.)।

त्रपती संभाजीनगर महापालिकेतील विविध ११ संवर्गातील २२२ पदे भरण्यासाठी महापालिकने ऑनलाइन अर्ज मागविले होते. कालावधीत तब्बल ५६ हजार ९०२ जणांनी अर्ज दाखल केले.

यातील ३१ हजार ८६७ अर्ज वैध, तर २५ हजार २३५ अर्ज अवैध ठरले. कादगपत्रांचा अभाव, परीक्षा शुल्क न भरल्यामुळे हे अर्ज अवैध ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महापालिकेत २२२ रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने मान्यता दिल्यानंतर, विभागीय आयुक्तांना आकृतीबंध सादर करण्यात आला, तसेच आयबीपीएस या एजन्सीसोबत भरती प्रक्रिया राबविण्यासाठी करार पूर्ण केला. विभागीय आयुक्तांची मान्यता मिळाल्यानंतर महापालिकेने २२२ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. १७फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. १८ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती, ही मुदत कमी असल्याने, ती वाढविण्याची मागणी झाल्याने, ३१ मार्चपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली होती.

आयबीपीएस एजन्सीमार्फत भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. भरतीसाठी अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेचे हॉलतिकिट ऑनलाइन पाठविण्यात येईल. त्यानंतर ऑनलाइन परीक्षा घेऊन, गुणवत्ता यादी महापालिकेकडे सोपविण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi