Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
छ. संभाजीनगर - शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांना खा. कल्याण काळे यांचा पाठिंबा

छ. संभाजीनगर - शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांना खा. कल्याण काळे यांचा पाठिंबा

त्रपती संभाजीनगर, 08 जुलै, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ व सहयोगी शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'बेमुदत धरणे आंदोलन २०२६' मध्ये सहभागी होऊन शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांना खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी पाठिंबा दिला.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शारीरिक शिक्षण शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम पिढी घडविण्याचे कार्य हे शिक्षक सातत्याने करत असतात. मात्र, आज त्यांनाच त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.

या आंदोलनातील प्रमुख मागण्या:

• जिल्हा परिषद क्रीडा शिक्षकांच्या सेवा प्रवेश नियमावली व सेवा अटी तातडीने जाहीर करून भरती प्रक्रिया सुरू करावी.

• शासन निर्णय दिनांक २ जानेवारी २०२६ नुसार मंजूर ४,८६० क्रीडा शिक्षकांची १००% पदे पवित्र पोर्टल (TAIT-2025) च्या पहिल्या टप्प्यात भरावीत.

• रिक्त होणाऱ्या शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदांवर इतर विषय शिक्षकांचे समायोजन न करता ती पदे नियमित भरतीद्वारे भरावीत.

• जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, शासकीय आश्रमशाळा तसेच समाजकल्याण विभागातील सर्व रिक्त शारीरिक शिक्षण शिक्षकांची पदे तातडीने भरावीत.

• TAIT-2025 भरती प्रक्रिया विलंब न लावता पूर्ण करावी.

शिक्षण व्यवस्थेला सक्षम बनवायचे असेल तर शिक्षकांच्या प्रश्नांकडे शासनाने संवेदनशीलतेने पाहून तातडीने सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. शिक्षकांचा सन्मान, त्यांचे हक्क आणि विद्यार्थ्यांचे भविष्य हे एकमेकांशी जोडलेले आहे.

या न्याय्य लढ्याला संपूर्ण पाठिंबा असून, शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन शिक्षकांना न्याय द्यावा,

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi