Dailyhunt

छ. संभाजीनगर - शिवना येथील श्री शिवाई देवीची बुधवारी पहाटे निघणार स्वारी

त्रपती संभाजीनगर, 07 एप्रिल (हिं.स.)। सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील श्री शिवाई देवीच्या वार्षिक चैत्री यात्रोत्सवाची सांगता बुधवारी (ता. आठ) पहाटे निघणाऱ्या 'देवीच्या स्वारीने' होणार आहे.

मंगळवारची (ता. सात) उत्तररात्र आणि बुधवारची पहाट, म्हणजेच पहाटे ३.३० वाजता ही स्वारी निघणार आहेत.

गेल्या पंधरवड्यापासून घटस्थापनेने सुरू झालेल्या या उत्सवात यंदा संकेत जोशी हे सात दिवसांचे कडक उपवास

करून देवीची स्वारी घेणार आहेत. बुधवारी पहाटे निवृत्त अभियंता सुनील आबाराव कादी यांच्या निवासस्थानातील स्वारीला शक्तिपीठापासून प्रारंभ होईल. शिवाई सांस्कृतिक सभागृहात गेल्या पाच दिवसांपासून महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या सोहळ्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. अनेक भाविक पोथ व ज्योत घेऊन आपले नवस फेडतील. या स्वारीने पंधरवाड्यापासून सुरू असलेल्या उत्सवाची सांगता होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi