Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

चंद्रपूर : 2 लाख 70 हजार 153 'अनकलेक्टेबल' मतदारांची यादी उपलब्ध

चंद्रपूर, 30 ऑगस्ट (हिं.स.)।

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत गृहभेटीदरम्यान मृत, कायमस्वरूपी स्थलांतरित, गैरहजर अथवा सापडू न शकलेले, दुबार किंवा अन्यत्र नोंदणी असलेले अशा एकूण 2 लाख 70 हजार 153 मतदारांची स्वतंत्र यादी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे तसेच जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

यामध्ये 51 हजार 913 मृत, 1 लाख 62 हजार 844 कायमस्वरूपी स्थलांतरित, 28 हजार 532 गैरहजर अथवा सापडू न शकलेले, 25 हजार 623 दुबार किंवा अन्यत्र नोंदणी असलेले आणि 1 हजार 241 इतर मतदारांचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi