मुख्य बातमी
चंद्रपूर : २४ तासात २७ करोनामुक्त ८ पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू
चंद्रपूर 23 जानेवारी (हिं.स.): जिल्ह्यात मागील २४ तासात २७ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर ८ करोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधीताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार ९३६ वर पोहोचली आहे. तसेच सुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ३८० झाली आहे. सध्या १७१ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ९४ हजार ७४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ लाख ६७ हजार ९६८ नमुने निगेटीव्ह आले आहेत. शनिवारी मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहराच्या गणेशनगर तुकुम येथील ६७ वर्षीय पुरूष व बाबुपेठ वार्ड येथील ७० वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३८५ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३४९, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १३, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. बाधीत आलेल्या आठ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील चार, चंद्रपूर तालुका एक, बल्लारपुर एक, नागभीड एक व इतर ठिकाणच्या एक रुग्णांचा समावेश आहे.
हिंदुस्थान समाचार