Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

चंद्रपूर - भाजपचे अरुण लाखानी यांची बिनविरोध निवड

चंद्रपूर, 04 जून, (हिं.स.)। इतर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अरुण लाखानी यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अरुण लाखानी यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शैलेश अग्रवाल आणि सुधीरचंद्र कोठारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने अरुण लाखानी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi