Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

चंद्रपूर : दावे व हरकतींसाठी 30 सप्टेंबरपर्यंत संधी

चंद्रपूर, 30 ऑगस्ट (हिं.स.)।

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-2026 अंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी दि.

31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे.नागरिकांना प्रारूप मतदार यादीसंदर्भातील दावे व हरकती 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे सादर करता येतील. प्राप्त दावे व हरकतींची मतदार नोंदणी अधिकारी चौकशी करून कायदेशीर तरतुदीनुसार निर्णय घेतील.

ईआरओ च्या निर्णयाविरोधात अपीलाचीही तरतूद: लोकप्रतिनिधीत्व कायदा, 1950 च्या कलम 24 अंतर्गत ईआरओ यांच्या निर्णयामुळे बाधित झालेल्या नागरिक अथवा मतदाराला अपील करण्याचा अधिकार आहे. ईआरओ यांच्या निर्णयाविरोधात 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे प्रथम अपील दाखल करता येईल.

प्रथम अपीलावरील निर्णयाबाबत समाधान न झाल्यास त्या निर्णयाच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे द्वितीय अपील दाखल करता येईल.

नागरिकांनी मतदार यादीत नाव तपासावे : जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव व तपशील काळजीपूर्वक तपासावेत. नाव समाविष्ट करणे, तपशिलात दुरुस्ती किंवा अन्य कोणतीही हरकत असल्यास निर्धारित कालावधीत संबंधित मतदान नोंदणी अधिकारी (ईआरओ) किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे दावा अथवा हरकत सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi