Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

चंद्रपूर : जिल्हाधिकारी कार्यालयात सिनीअर आयटी असिस्टंटसाठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूर, 30 एप्रिल, (हिं.स.)। जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे सिनीअर आयटी असिस्टंटच्या एका पदासाठी मानधन तत्वावर अर्ज मागविण्यात येत आहे. सदर पदासाठी उमेदवाराकडे शैक्षणिक पात्रता कम्प्युटर इंजिनिअरींगमध्ये पदवी (बी.ई/बी.टेक) असणे आवश्यक.

तसेच ई-गव्हर्नन्स (e-Governance) क्षेत्रातील कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सोबतच शासकीय / निमशासकीय प्रकल्पांवरील अनुभव असणे अपेक्षित, संगणक प्रणाली, नेटवर्किंग, डेटा व्यवस्थापन व सॉफ्टवेअर अंमलबजावणी यांचे ज्ञान, आवश्यक आहे. उमेदवाराची वयो मर्यादा किमान 18 वर्ष व कमाल 38 वर्षे (शासकीय नियमानुसार सवलत लागू ) असावी. दरमहा 40 हजार ते 70 हजार रुपये प्रति महिना मानधन अनुज्ञेय राहील (अनुभव व पात्रतेनुसार निश्चित करण्यात येईल)

इच्छुक उमेदवारांनी 28 एप्रिल ते 5 मे या कालावधीत (शासकीय सुट्टीचे दिवस सोडून) सामान्य शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे अर्ज करावा. अर्जासोबत कम्प्युटर इंजिनियरींगची पदवी, आधार कार्ड झेरॉक्स, जन्म नोंदणी प्रमाणपत्र, कामाचे अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi