Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

चंद्रपूर : जिल्ह्यातील 2066 मतदान केंद्रांना निवडणूक आयोगाची अंतिम मंजुरी

चंद्रपूर, 30 ऑगस्ट (हिं.स.)।

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-2026 अंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी दि.

31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे. या प्रारूप मतदार यादीत, जिल्ह्यातील एकूण 15 लाख 27 हजार 502 मतदारांचा समावेश आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासून आवश्यक दावे व हरकती 30 सप्टेंबर 2026 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 2066 मतदान केंद्रांना अंतिम मंजुरी दिली आहे. यामध्ये 13 मतदान केंद्रे विलीन अथवा रद्द करण्यात आली असून 3 नवीन मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. मतदान केंद्रांची संपूर्ण यादी जिल्हा प्रशासनाच्या chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi