Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

छत्रपती संभाजी नगर - भाजपचे ७,एमआयएमचे १६ नगरसेवक अपात्रतेच्या फेऱ्यात

छत्रपती संभाजीनगर, 01 ऑगस्ट (हिं.स.)।

त्रपती संभाजी नगर महापालिकेत पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधााण आले आहे. भाजपचे ७,एमआयएमचे १६ नगरसेवक अपात्रतेच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने भाजपच्या ७ आणि एमआयएमच्या १६ अशा एकूण २३ नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा बजावल्या आहेत. बेकायदा बांधकाम, अतिक्रमण, तिसरे अपत्य आदी कारणांवरून पराभूत उमेदवारांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने चौकशी करून कारवाई सुरू केली आहे. संबंधित नगरसेवकांना ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये सुनावणीसाठी बोलावण्यात आले असून कागदपत्रांसह बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. समाधानकारक उत्तर न दिल्यास एकतर्फी निर्णय घेतला जाऊ शकतो. सर्व कागदपत्रासह आणि पुराव्यानिशी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील महिन्यात संबंधितांना बोलवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi