Dailyhunt

धम्मदेशना सोहळ्याच्या सभामंडपाचे भूमीपूजन : बुद्ध पौर्णिमेनिमित्त 1 मे रोजी मांडाखळीत आयोजन

परभणी, 30 एप्रिल (हिं.स.)।

श्रय सेवाभावी संस्था व गगन मलिक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मांडाखळी उमरी परिसरातील नियोजित बुद्ध विहाराच्या दहा एकर परिसरात शुक्रवार 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त भव्य धम्मदेशना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याच्या सभामंडपाचे भूमीपूजन आज 29 एप्रिल रोजी उपस्थित मान्यवर व पंचक्रोशीतील उपासक यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून व कुदळ मारून करण्यात आले.

यावेळी पूज्य भंते मोगलायन यांनी उपस्थित सर्वांना त्रिशरण पंचशील दिले. याप्रसंगी आयोजक डॉ. सिध्दार्थ हत्तीअंबीरे, डॉ. बी. टी. धुतमल, समाजकल्याण सभापती प्रा. डॉ. राजेश रणखांबे, मिलिंद खिल्लारे, माजी नगरसेवक संदीप हिवाळे, मिलिंद घुसळे, मांडाखळी उमरी पंचक्रोशातील उपासकांची उपस्थिती होती.

दरम्यान 1 मे रोजी आयोजित या धम्मदेसना सोहळ्याचे उद्घाटन थायलंड बुद्ध विहार, बुद्धगया येथील सचिव पूज्य भदंत बोधीविदेश वज्रविशुद्ध यांच्या हस्ते होणार असून प्रमुख धम्मदेशना त्यांच्या वतीने दिली जाणार आहे. तसेच पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, पूज्य भदंत पायबोधी थेरो, भदंत धम्मबोधी, पूज्य भदंत मोगलायन आदी भदंतांची उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजेश विटेकर, माजी आमदार बाबाजानी दुर्रानी तसेच सिने अभिनेते व गगन मलिक फाउंडेशनचे अध्यक्ष गगन मलिक उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास जास्तीत जास्त उपासक-उपासिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक व आश्रय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi