Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धाराशिव-बीड-लातूरसाठी भाजपकडून चार नावांची शिफारस; उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात?

धाराशिव-बीड-लातूरसाठी भाजपकडून चार नावांची शिफारस; उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात?

लातूर, 30 मे (हिं.स.)। धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून संभाव्य उमेदवारांची यादी अंतिम टप्प्यात पोहोचली असून चार प्रमुख नावांवर शिक्कामोर्तब करून ती दिल्लीला पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या यादीमध्ये बसवराज पाटील, दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील-निलंगेकर आणि ओमप्रकाश शेटे यांच्या नावांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून या नावांवर चर्चा सुरू असून अंतिम निर्णय दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाकडून घेतला जाणार आहे.

स्थानिक राजकारणात या चारही नावांची मोठी चर्चा रंगली असून प्रत्येक उमेदवाराची स्वतंत्र राजकीय ताकद आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव लक्षात घेता भाजप कोणावर अंतिम विश्वास दाखवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली असून संभाव्य उमेदवारांच्या समर्थकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi