Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

धुळ्यात कथित गोहत्येविरोधात गोरक्षकाचे आमरण उपोषण

धुळे, 02 जून (हिं.स.) | बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात गोहत्या झाल्याचा आरोप करीत गोरक्षक विकास गोमसाळे यांनी दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु केले आहे.

उपोषणाचा चौथा दिवस असूनही प्रशासनाकडून ठोस भूमिका किंवा प्रभावी कार्यवाही दिसून येत नसल्याने गोरक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याविरुध्द शहरात मोर्चा काढण्याचाही इशारा देण्यात आला.

आंदोलक विकास गोमसाळे यांनी म्हटले आहे की, महानगरपालिकेच्या वाहनांचा व यंत्रणेचा वापर अवैधपणे करण्यात आलेल्या कत्तलीतील गोवंशाचे अवशेष उचलण्यासाठी आणि नष्ठ करण्यासाठी मदत करण्यात आली, पोलीस संरक्षणात ही वाहने नेण्यात आली, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. गोवंश हत्येसारख्या संवेदनशील विषयावर प्रशासनाने मौन न बाळगता सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी उपोषणकर्ते विकास गोमसाळे यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी एसआटी नेमून सर्व दोषी अधिकारी आणि कसाई यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी आंदोलनाला पाठींबा देत गोरक्षक संजय शर्मा, प्रभाताई परदेशी, रोहित विभाडींक, हर्षल परदेशी, कुणाल तारगे, गुलाब माळी, प्रितेश अग्रवाल, नितीन गोमसाळे, नाना वाघ, स्वरा जोगी डॉक्टर योगेश पाटील, अंश भावसार, उमेश चौधरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi