Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दिंडीतील वाहनांना तिहेरी धडक : वृद्ध वारकऱ्याचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी

दिंडीतील वाहनांना तिहेरी धडक : वृद्ध वारकऱ्याचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी

बीड, 30 जुलै (हिं.स.)।

क अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. आषाढी वारी सोहळा आटोपून परतीच्या मार्गावर असलेल्या वारकऱ्यांच्या वाहनांना एका भीषण अपघाताचा सामना करावा लागला आहे.

केज-कळंब महामार्गावर साळेगाव परिसराजवळ ट्रॅक्टर, क्रूझर आणि कार अशा तीन वाहनांमध्ये झालेल्या तिहेरी भीषण अपघातात एका वृद्ध वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य अकरा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील संत राघोजी महाराज संस्थान बोराळा येथील ह.भ.प. नरहरी नारायण वानखेडे महाराज यांची दिंडी सोहळा आटोपून परतीच्या मार्गाने केजच्या दिशेने जात होती. हा वारकऱ्यांचा ट्रॅक्टर केज ते कळंब दरम्यान खामगाव-सांगोला महामार्ग क्रमांक ५४८-सी वर साळेगाव येथील एका चार्जिंग स्टेशनजवळ आला असता, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका क्रूझर गाडीने या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या दोन वाहनांची समोरासमोर तीव्र धडक झाल्यानंतर त्याच दिशेने वेगाने जाणारी एक कार देखील या अपघातग्रस्त वाहनांवर येऊन धडकली. ट्रॅक्टर, क्रूझर आणि कार या तिन्ही वाहनांचा हा अपघात इतका भीषण होता की, ट्रॅक्टरचे हेड पूर्णपणे तुटून त्याचे दोन भाग झाले होते.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi