Dailyhunt

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने अंतर्गत त्रुटींची पूर्तता तात्काळ करण्याचे आवाहन

रभणी, 30 एप्रिल, (हिं.स.)। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षातील विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जामध्ये असलेल्या त्रुटी पुर्ण करण्याबाबत यापुर्वी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाने वारंवार कळविले आहे, परंतू काही विद्यार्थ्यांनी अद्यापही त्रुटीची पुर्तता केलेली नाही.

अशा विद्यार्थ्यांनी दि. 5 मे, 2026 पर्यंत ऑनलाईन त्रुटीची पुर्तता करून त्यांची प्रिंट ऑफलाईन पद्धतीने सदर कार्यालयात जमा करावी. मुदतीपुर्वी ज्यांनी त्रुटीची पुर्तता केली नाही अशा विद्यार्थ्यांचे अर्ज कायमस्वरूपी अपात्र ठरविण्यात येतील, तरी विद्यार्थ्यांनी विहीत वेळेत त्रुटीची पुर्तता करावी, असे आवाहन कार्यालयाचे विशेष अधिकारी अनिल अंजनिकर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi