Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

एआयएमआयएम नगरसेवकांच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप आढळल्यास कारवाई करावी

विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांची भूमिका

त्रपती संभाजीनगर, 27 ऑगस्ट (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विकासकामांमध्ये एमआयएम नगरसेवकांच्या नातेवाईकांकडून हस्तक्षेप होत असल्याच्या आरोपावरून मनपा सभेत गदारोळ झाला.

कंत्राटदाराला भेटण्यासाठी बोलावून त्याच्यावर दादागिरी केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

नगरसेवकांच्या नातेवाईकांचा महानगरपालिकेच्या विकासकामांमध्ये हस्तक्षेप आढळून आल्यास संबंधितांवर थेट गुन्हा दाखल करावा, अशी भूमिका एमआयएमचे विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी मांडली.

महानगरपालिकेच्या कामकाजात कोणत्याही नगरसेवकाच्या नातेवाईकांनी हस्तक्षेप करू नये, असे स्पष्ट करत बिल्डर म्हणाले की, "कोणीही आणि कोणत्याही नातेवाईकांनी महानगरपालिकेच्या कामकाजात हस्तक्षेप करू नये."

विकासकामांमध्ये कंत्राटदारांवर दबाव आणणे किंवा अनधिकृतपणे हस्तक्षेप करणे योग्य नसून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi