Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! राजस्थान व नेपाळ येथील ५ पीडित महिलांची सुटका

ळगाव , 30 मे (हिं.स.) चोपडा शहरात गेल्या काही दिवसांपासून छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या एका मोठ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा चोपडा शहर पोलिसांनी धडक कारवाई करत पर्दाफाश केला आहे. अनैतिक मानवी व्यापाराविरोधात पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात चक्क राजस्थान आणि नेपाळ येथील ५ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी २ महिला आरोपींना जागेवरच अटक केली असून, फरार झालेल्या इतर ९ पुरुष आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. चोपडा शहरातील प्रताप हायस्कूलच्या मागे आणि तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या स्मशानभूमी ट्रस्टलगत एका गुप्त ठिकाणी हा कुंटणखाना सुरू होता. संशयित आरोपी येथे गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांना आश्रय द्यायचे. त्यानंतर त्यांच्याकडून सक्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या छाप्यानंतर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२४/२०२६ अन्वये अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ (PITA) च्या कलम ३, ४, ५, ७ आणि भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३ अंतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या महिला आरोपी: चिल्ला राजू लामा (वय ३५) आणि पूजा टीकाराम थापा (वय २९, दोघी रा. चोपडा). फरार आरोपी (पोलीस शोध घेत आहेत): शिवाजी भीमराव पाटील, फरीद कबीर शेख, शाहबद वाहिद खान, शारीफ सत्तार तडवी, बाबू उर्फ जितेंद्र बाबूराव वाघे, फिरोजी हंसा खान, बाबू उर्फ जितेंद्र श्रावण वाघे, संदीप उर्फ सोनू लक्ष्मण पाटील आणि सुरेंद्र राजपूत (सर्व रा. चोपडा, जि. जळगाव).सुटका करण्यात आलेल्या पाचही पीडित महिला परराज्यातील (राजस्थान) आणि नेपाळमधील असल्याने या सेक्स रॅकेटची पाळेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खोलवर असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi