Dailyhunt
होर्मुज मार्गात पुन्हा तणाव; काही तासांत दोन जहाजांवर हल्ले

होर्मुज मार्गात पुन्हा तणाव; काही तासांत दोन जहाजांवर हल्ले

बुधाबी, 04 मे (हिं.स.)।पश्चिम आशियातील अतिशय संवेदनशील समुद्री मार्ग होर्मुज जलसंधीमध्ये पुन्हा एकदा सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. होर्मुज जलसंधीमध्ये काही तासांच्या अंतरात दोन जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता वाढली आहे.

ब्रिटनची समुद्री सुरक्षा संस्था युनायटेड किंगडम मॅरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स (यूकेएमटीओ) यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी उशिरा रात्री सुमारे ११:४० वाजता संयुक्त अरब अमिरातमधील फुजैरा किनाऱ्याजवळ एका तेलवाहू टँकरवर अज्ञात प्रोजेक्टाइलने हल्ला करण्यात आला. संस्थेच्या माहितीनुसार, या हल्ल्यात जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित असून कोणतेही पर्यावरणीय नुकसान झालेले नाही. मात्र, या हल्ल्यामागे नेमके कोण आहे, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

याआधीही रविवारी याच जलसंधीत एका दुसऱ्या जहाजावर हल्ला झाला होता. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे या भागातील अस्थिरता आणखी वाढली आहे, विशेषतः इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर.तज्ज्ञांच्या मते, होर्मुज जलसंधी हा जागतिक तेलपुरवठ्याचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून, जगातील मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल याच मार्गाने वाहतूक केले जाते. त्यामुळे येथे कोणतीही सुरक्षा त्रुटी किंवा हल्ला झाल्यास जागतिक बाजारपेठ आणि समुद्री व्यापारावर व्यापक परिणाम होऊ शकतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi