Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

इंधन टंचाईबाबत उपाययोजना करण्याची निवेदनातून मागणी

बीड, 28 मे (हिं.स.)।

इंधन टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, वाहनधारक त्रस्त असून अत्यावश्यक सेवांवर परिणाम झाला आहे. पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा, वीज प्रश्न सोडवावा, अशी मागणी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी शेतकऱ्यांसह जॉन्सन यांची भेट घेऊन निवेदन दिले. पेट्रोल पंपांवर होणारी साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागामार्फत आवश्यक नियोजन करावे, बियाणे व खतांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा तसेच शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी केली. रुग्णवाहिका सेवा, शासकीय आपत्कालीन यंत्रणा व आरोग्य सेवांना प्राधान्याने इंधन उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून रुग्णसेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi