Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांना निर्बंध लावण्यास मागेपुढे पाहणार नाही- मार्को रुबिओ

इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांना निर्बंध लावण्यास मागेपुढे पाहणार नाही- मार्को रुबिओ

वॉशिंग्टन , 03 सप्टेंबर (हिं.स.)। अमेरिकेने आता इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांना इशारा दिला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटले आहे की, कोणताही देश इराणसोबत व्यापार सुरू ठेवत असेल, तर ट्रम्प प्रशासन त्या देशावर निर्बंध लावण्यास अजिबात मागेपुढे पाहणार नाही.एका प्रश्नाला उत्तर देताना मार्को रुबिओ यांनी हे वक्तव्य केले.

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे झालेल्या एससीओ बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्यात झालेल्या भेटीबाबत पत्रकाराने रुबिओ यांना प्रश्न विचारले की, पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान आणि इराणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. असे दिसते आहे की, दोन्ही देश काही प्रकारचा व्यापार करार करण्याच्या तयारीत आहेत. या प्रश्नाला उत्तर देताना अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ म्हणाले, "भारत आणि इराणमध्ये कोणताही व्यापार करार झाला आहे, असे मला वाटत नाही."ते पुढे म्हणाले, "साहजिकच, प्रत्येक देश आपले स्वतंत्र परराष्ट्र धोरण ठरवतो. जगातील अनेक देश इराणच्या सत्ताधाऱ्यांशी चर्चा करतात. अगदी आम्हीही इराणच्या काही अधिकाऱ्यांशी बैठका घेतल्या आहेत आणि त्यांच्याशी संपर्क साधला आहे."

अखेर रुबिओ यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही देशाने इराणला निर्बंधांपासून वाचण्यासाठी मदत करू नये. कोणत्याही देशाने इराणला अशा प्रकारच्या व्यवस्था उभारण्यात मदत करू नये, ज्यामुळे इराणला पैसा कमावता येईल आणि त्या पैशाचा वापर दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा अण्वस्त्रे विकसित करण्याच्या प्रयत्नांसाठी करता येईल.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ट्रम्प म्हणाले की, "आम्ही इराणसोबतच्या युद्धात सातत्याने विजय मिळवत आहोत. इराणचे मिशन आता केवळ काही काळाचा प्रश्न असून ते लवकरच संपेल. आम्ही तेथे खूप चांगली कामगिरी करत आहोत".

ट्रम्प यांनी दावा केला की, इराणची नौदल, हवाई दल आणि लष्कर उद्ध्वस्त झाले असून त्यांच्याकडे आता काहीही उरलेले नाही. ट्रम्प पुढे म्हणाले की, आता होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेचे नियंत्रण आहे आणि तेथून अनेक जहाजे मार्गक्रमण करत आहेत. दरम्यान, ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीचे नाव बदलण्याची कल्पनाही मांडली आहे. "याचे नाव 'ट्रम्प स्ट्रेट' का ठेवू नये?" असे ते म्हणाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi