Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
इराणविरोधातील युद्ध संपल्याचा दावा, ट्रम्प यांची मोठी घोषणा

इराणविरोधातील युद्ध संपल्याचा दावा, ट्रम्प यांची मोठी घोषणा

वॉशिंग्टन, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आता संपुष्टात आले आहे. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे. ट्रम्प यांनी नुकतीच कतारचे पंतप्रधान यांची भेट घेतली होती.

त्यानंतर त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.

ट्रम्प यांनी इराणसोबतचा संघर्ष लष्करीदृष्ट्या जवळपास संपुष्टात आल्याचे म्हटले.ट्रम्प म्हणाले, लष्करीदृष्ट्या इराण जवळपास संपला आहे. आम्ही सध्या केवळ परिस्थिती कायम ठेवत आहोत. मी कोणतीही हमी देऊ शकत नाही; मात्र पुन्हा कारवाई करण्याची वेळ आली, तर आम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. सध्या कोणत्याही लष्करी कारवाईची गरज वाटत नाही. संपूर्ण मध्यपूर्व आता युरेनियमशी संबंधित धोक्यांपासून सुरक्षित आहे. हा संघर्ष आता संपुष्टात येण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. मला वाटते की हे युद्ध लवकरच संपेल.

ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, इराणची ताकद पूर्णपणे मोडून काढण्यात आली आहे. मात्र, इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम कायमस्वरूपी निष्प्रभ करण्यासाठी दीर्घकालीन तोडगा काढणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. इराणची उत्पादन क्षमता कमी झाली असून, ती जवळपास ८५ टक्क्यांनी घटली आहे. ते आमच्याशी चर्चा करत आहेत आणि अत्यंत नम्रपणे बोलत आहेत. पुढे काय होते, हे पाहावे लागेल; मात्र हा विषय संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे.

ट्रम्प पुढे म्हणाले, लष्करी कारवाई पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेतील नागरिक आणि जगभरातील लोक गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत अधिक सुरक्षित असतील. कारण इराणमुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आम्हाला पुन्हा लष्करी कारवाई करण्याची वेळ आली, तर आम्ही त्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi