Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

जळगाव - जिल्हास्तरीय लोकशाही दिन ६ जुलै रोजी आयोजन

Hindusthan Samachar 4 months ago

जळगाव, 02 जुलै, (हिं.स.) प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार जुलै महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

तरी नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर केलेला असेल आणि त्या अर्जासंदर्भात एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरून कोणतेही उत्तर प्राप्त झाले नसेल, अशा वैयक्तिक हितसंबंधाच्या तक्रारींसह संबंधित नागरिकांनी जिल्हास्तरीय लोकशाही दिनास उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi