Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जळकोटमध्ये जुगार अड्ड्यावर धाड; ४.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळकोटमध्ये जुगार अड्ड्यावर धाड; ४.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त

लातूर, १ ऑगस्ट (हिं.स.) : नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या निर्देशानुसार विशेष पोलीस पथकाने लातूर जिल्ह्यातील जळकोट परिसरात कारवाई केली.

या कारवाईत जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, ४ लाख ६४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांचे पथक जळकोट भागात रवाना करण्यात आले होते. या पथकाने १ ऑगस्ट २०२६ रोजी जळकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत अर्जुन संभाजी वाघमारे यांच्या शेतशिवारातील टीन शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

या कारवाईत पोलिसांनी ५८ हजार ३६० रुपयांची रोकड, सात मोबाईल फोन आणि आठ मोटारसायकली असा एकूण ४ लाख ६४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या नऊ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस हवालदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे आणि गजानन डवरे यांनी सहभाग घेतला.

पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कामासाठी प्रोत्साहित केले.

'खबर' हेल्पलाइनद्वारे अवैध व्यवसायांची माहिती द्या

नागरिकांना त्यांच्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवता यावी, यासाठी नांदेड परिक्षेत्राच्या पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने 'खबर' हेल्पलाइन सुरू केली आहे.

नागरिकांनी ९१ ५० १०० १०० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून अवैध व्यवसायांबाबत माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi