Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कराचीत कुख्यात गँगस्टर उजैर बलोचच्या भावावर अंधाधुंद गोळीबार

कराचीत कुख्यात गँगस्टर उजैर बलोचच्या भावावर अंधाधुंद गोळीबार

स्लामाबाद, 31 जुलै (हिं.स.)।पाकिस्तानातील कराचीच्या लियारी भागात 'धुरंधर गँग'ची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. पीपल्स अमन कमिटीचा प्रमुख आणि कुख्यात गँगस्टर उजैर बलोच याचा भाऊ जुबैर बलोच याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला.

ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

माहितीनुसार, मोटारसायकलवरून आलेल्या सशस्त्र हल्लेखोरांनी जुबैर बलोच याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात त्याच्या छाती आणि पोटात अनेक गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला. गोळीबारात दोन वाटसरू देखील जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वृत्तानुसार, दक्षिण विभागाचे उपमहानिरीक्षक (डीआयजी) सय्यद असद रझा यांनी सांगितले की, जुबैर बलोचला 2012 मध्ये सात गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी 2025 मध्ये त्याची सुटका करण्यात आली होती. डीआयजी रझा यांनी पुढे सांगितले की, हल्ल्यावेळी जुबैर आपल्या लियारीतील निवासस्थानाबाहेर बसला होता. त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या संशयित हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. हल्लेखोरांनी आपले चेहरे झाकलेले होते. मात्र, जवळील एका दुकानदाराने प्रत्युत्तरादाखल गोळीबार केल्याने हल्लेखोरांनी तेथून पलायन केले.

स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी जुबैर एका राजकीय पक्षात सहभागी झाला होता. तसेच त्याने आपल्या परिसरात त्या पक्षाचे झेंडेही लावले होते.

डीआयजी रझा यांनी सांगितले की, या घटनेचा तपास विविध अंगांनी सुरू असून गँगमधील वैर, जुनी शत्रुत्वाची प्रकरणे आणि वैयक्तिक वैमनस्य यांचाही तपास केला जात आहे.

उजैर बलोच आणि त्याच्या सहकाऱ्यांवर 2012 मध्ये कलाकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत शस्त्रे आणि स्फोटकांच्या साहाय्याने कायदा अंमलबजावणी यंत्रणांवर हल्ला केल्याचा आरोप होता. एप्रिल 2020 मध्ये लष्करी न्यायालयाने उजैर बलोचला हेरगिरीच्या आरोपात दोषी ठरवत 12 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi