Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
केतन अग्रवालचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे निधन

केतन अग्रवालचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे निधन

पुणे, 05 जुलै (हिं.स.)। केतन अग्रवालचे आजोबा देवीचंद अग्रवाल (वय ७१) यांचे शनिवारी सायंकाळी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मागील दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

केतन अग्रवाल हत्याप्रकरणाचा तपास सुरू असतानाच त्यांच्या निधनामुळे अग्रवाल कुटुंबावर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे.

केतन अग्रवाल यांच्या मृत्यूनंतर अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि केतनला न्याय मिळावा, यासाठी देवीचंद अग्रवाल सातत्याने प्रयत्नशील होते. त्यांनी विविध माध्यमांतून आपली भूमिका मांडत तपास निष्पक्ष आणि सखोल व्हावा, अशी मागणी वारंवार केली होती. गेल्याच आठवड्यात पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कँडल मार्चमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी या प्रकरणातील जबाबदार प्रत्येक व्यक्तीची पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केली होती.

देवीचंद अग्रवाल यांच्या पश्चात दोन मुले, सुना आणि अन्य कुटुंबीय असा परिवार आहे. केतन अग्रवाल हत्याप्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. अशा वेळी नातवासाठी न्यायाची लढाई लढणारे देवीचंद अग्रवाल यांच्या निधनाने अग्रवाल कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi