Dailyhunt
खरात प्रकरणात काळ्या दगडाच्या तपासासाठी एसआयटीची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली

खरात प्रकरणात काळ्या दगडाच्या तपासासाठी एसआयटीची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली

आठव्या गुन्ह्यात थेट न्यायालयीन कोठडी

नाशिक, 30 एप्रिल (हिं.स.)

- भोंदू बाबा अशोक खरात याला आज न्यायालयाने आठव्या गुन्ह्यामध्ये सरकारी पक्षाची पोलीस कोठडीची मागणी फेटाळून न्यायालयाने कोठडी दिली आहे.

त्यामुळे या प्रकरणात पहिल्यांदीच एसटीची मागणी न्यायालयाने फेटाळुन लावल्याने एसटीला मोठी चपराक बसली आहे

मागील महिन्यामध्ये १५ मार्च रोजी भोंदू बाबा अशोक खरात याला लैंगिक छळ व शोषण यासह इतर प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली होती आतापर्यंत त्याच्यावरती नाशिक मध्ये नऊ गुन्हे दाखल आहेत त्यापैकी सात गुन्हा मध्ये पोलीस कोठडी देण्यात आली होती. आठव्या प्रकरणांमध्ये घरातला मात्र थोडासा तरी दिलासा मिळाला आहे.

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात यापूर्वी ओशनो जल, चिंचोके, रिंगमेजरमेंट अशा विविध गोष्टींचा उल्लेख झाला. आता या प्रकरणात काळा दगडाचाही उल्लेख झाल्याने गुढ आणखी वाढले आहे. खरातला त्याच्यावर दाखल असलेल्या आठव्या गुन्ह्यात एसआयटीने आज गुरुवारी (दि. ३०) व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केलं होतं व पोलिस कोठडीची मागणी केली. एसआयटीने कोर्टात तो काळा दगड आणला होता. त्यावरून आरोपीचे वकील आणि सरकारी वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाला.

सुनावणीवेळी तपास अधिकाऱ्याने तपासाची माहिती कोर्टाला दिली. त्यानंतर सरकारी वकिलानेही युक्तिवाद केला. काळ्या दगडाचं गूढ अद्याप उकललं गेलं नाही. इतर गुन्ह्यांमध्ये काळा दगड मिळाला नव्हता तो पहिल्यांदा या गुन्ह्यात मिळाला आहे. काळा दगड त्याने कशासाठी ठेवला होता? त्याची काय भानगड आहे याचा तपास करायचा आहे. तसेच पीडित कुटुंबाची त्याने आर्थिक फसवणूक केल्याचाही संशय असून, आरोपीच्या समक्ष चौकशी होणे गरजेचे आहे असे सांगत सरकारी पक्षाने पोलिस कोठडीची मागणी केली.

यावेळी खरातच्या वकिलांनी तपास यंत्रणेचा युक्तिवाद खोडून काढताना आक्रमक पवित्रा घेतला. या काळ्या दगडाचा काय तपास करणार? असा सवाल खरातच्या वकिलांनी केला. सीसीटीव्ही व जुन्या तपासाचा दाखला देत त्यांनी पोलीस कोठडीची गरज नसल्याचा प्रभावी युक्तिवाद केला. आर्थिक व्यवहारांचा संशय आहे असे इतर गुन्ह्यात नमूद नाही, मग आताच हे कसे आले? असा सवाल केला. त्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी एसआयटीची पोलीस कोठडीची मागणी अमान्य केली. खरातला 12 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi