Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालकपदी अमोल महाजन

कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालकपदी अमोल महाजन

रायगड, 04 ऑगस्ट (हिं.स.) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकारी अमोल महाजन यांनी मंगळवारी कोकण भवन, नवी मुंबई येथील विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक (माहिती) पदाचा कार्यभार स्वीकारला.

या पदावर कार्यरत असलेल्या संजीवनी जाधव यांच्या बदलीनंतर हे पद रिक्त झाले होते. यासोबतच त्यांनी जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग येथील माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारही स्वीकारला आहे.

कोकण विभागातील शासकीय जनसंपर्क, माहिती प्रसारण आणि प्रसारमाध्यमांशी समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी आता महाजन यांच्याकडे असणार आहे. त्यांनी आपल्या सेवाकाळात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रभावीपणे काम केले आहे.सन २००० ते २०१० या कालावधीत त्यांनी जिल्हा माहिती कार्यालय, बीड येथे सेवेला सुरुवात केली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत राहून विभागीय स्तरावरील अनुभव मिळविला. २०१२ ते ऑक्टोबर २०२२ या काळात जिल्हा माहिती कार्यालय, जालना येथे उपसंपादक म्हणून त्यांनी शासकीय प्रकाशने, वृत्तलेखन आणि कार्यालयीन प्रशासनात उल्लेखनीय कामगिरी बजावली.

ऑक्टोबर २०२२ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत त्यांनी जिल्हा माहिती कार्यालय, अहिल्यानगर येथे माहिती अधिकारी म्हणून कार्य करत राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा प्रभावी प्रचार-प्रसार केला.४ ऑगस्ट २०२६ पासून त्यांनी कोकण विभागीय माहिती कार्यालयात सहायक संचालक म्हणून नवीन जबाबदारी स्वीकारली आहे. कोकण विभागातील विकासकामे, शासकीय धोरणे आणि योजनांचा अधिक प्रभावी प्रचार-प्रसार करणे, तसेच रायगड जिल्ह्याच्या माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळताना प्रसारमाध्यमांशी सुसंवाद अधिक दृढ करण्याला प्राधान्य राहील, असा विश्वास अमोल महाजन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi