Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कोल्हापूरच्या भव्य तैलिक समाज मेळाव्यासाठी समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन

कोल्हापूरच्या भव्य तैलिक समाज मेळाव्यासाठी समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन

बीड, 04 ऑगस्ट (हिं.स.)। कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य तैलिक समाज मेळावा होणार आहे, या मेळाव्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बीड जिल्हाध्यक्ष संगमेश्वर आप्पा फुटके यांनी केले आहे.

कोल्हापूर येथे २३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या तैलिक समाजाचा भव्य मेळावा होणार आहे. या ऐतिहासिक मेळाव्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा शिवसेना सांगली जिल्हाध्यक्ष (शिंदे गट) सन्माननीय संजय बापू विभुते परळी वैजनाथ येथे आले होते. बीड जिल्हाध्यक्ष संगमेश्वर आप्पा फुटके यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा सचिव प्रा. मधुकर शिंदे यांनी संजय बापू विभुते यांचे स्वागत केले. तर परळी तेली युवक संघटनेचे अध्यक्ष पवनजी फुटके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी समाजबांधवांना मार्गदर्शन करताना संजय बापू विभुते म्हणाले की, समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकजुटीने आणि संघटितपणे काम करणे ही काळाची गरज आहे. विशेषतः तरुणांनी सामाजिक कार्यासोबतच राजकारणातही सक्रिय सहभाग घेऊन समाजाच्या हितासाठी सक्षम आणि चांगले नेतृत्व निर्माण केले पाहिजे. कोल्हापूर येथे २३ ऑगस्ट रोजी होणारा भव्य समाज मेळावा हा समाजाच्या एकजुटीचे आणि संघटनशक्तीचे दर्शन घडविणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार असून, या मेळाव्यास बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.

या वेळी शहराध्यक्ष राजकुमार भाग्यवंत, तालुकाध्यक्ष मनोज जठार, कोषाध्यक्ष तुळशीदासजी सालमोटे, प्रा. गणेश परळीकर, ज्येष्ठ समाजबांधव सूर्यकांत आप्पा व्यवहारे, छगन आप्पा शिरसागर, सोमनाथ शिरसागर सर, सोमनाथ वाघमारे, राहुल भाग्यवंत, ईश्वर चर, शिवशंकर जठार, दीपक साखरे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi