Dailyhunt
कोपरगावात गांवदेवी मातेच्या वार्षिक महोत्सवात आकर्षण ठरला दादूस कोळीगीतांचा मराठी वाद्यवृंद

कोपरगावात गांवदेवी मातेच्या वार्षिक महोत्सवात आकर्षण ठरला दादूस कोळीगीतांचा मराठी वाद्यवृंद

डोंबिवली, 30 एप्रिल (हिं.स.) डोंबिवली पश्चिम विभागातील कोपरगांवात सालाबादपमाणे गांवदेवी मंदिरात गावदेवी मातेचा वार्षिक महोत्सव आठ दिवस मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. कडोंमपाचे ज्येष्ठ नगरसेवक तथा गांवदेवी मित्र मंडळाचे आधारस्तंभ रमेश सुकऱ्या म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व गांवदेवी मित्र मंडळ अध्यक्ष अनंता बाळाराम म्हात्रे यांच्या देखरेखखाली संपन्न झाला.

गांवदेवी मित्र मंडळ माध्यमातून कोपर, डोंबिवली (प.) येथे सोमवार, दि.२०/०४/२०२६ ते मंगळवार, दि. २८/०४/२०२६ रोजी गांवदेवी मातेच्या महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक दिवशी पारंपरिक पद्धतीने देवीची पुरोहितांच्या मंत्रोपचाराने पूजा करण्यात येत होती. दररोज भजन, कीर्तन, सामुदायिक हरीपाठ, प्रवचनाने वातावरण भक्तिमय झाले होते. संपूर्ण देऊळ परिसर रोषणाईने सजविण्यात आले होते. मंगळवारी सर्व गावातील तसेच पाहुण्या देवी भक्तगणांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे बारा ते तेरा हजार देवभक्ती महाप्रसादाचा लाभ घेतला.

या गावदेवीच्या वार्षिक महोत्सवाविषयी रमेश म्हात्रे म्हणाले, दर वर्षी हा महोत्सव साजरा केला जातो. काही गावात याला जत्रा म्हणतात. मात्र या उत्सवात कोणत्याही प्रकारचे मांसाहार केला जात नाही. गावदेवीचा उत्सव पूर्णपणे शाकाहारी असतो. गावातील प्रत्येक देवीचा भक्त या उत्सवासाठी वेळ देत असतो. गावातील महिलांचा मोठा पुढाकार असतो. आमच्या गावातील हा उत्सव म्हणजे गावाचा एकोपा समजून येतो. यावर्षी दादूस मराठी ऑर्केस्ट्रा संतीष चौधरी प्रस्तुत कोळी गीते व लोक गीतांचा मनमुराद आनंद उपस्थित गांवदेवी भक्तप्रेमींनी घेतला.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi