Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांवरील अवैध पार्किंगविरोधात विशेष तपासणी मोहीम

लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांवरील अवैध पार्किंगविरोधात विशेष तपासणी मोहीम

लातूर, 30 जुलै (हिं.स.)। मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांवरील अवैध पार्किंगविरोधात विशेष संयुक्त कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे.

राष्ट्रीय महामार्गांवर अवैधरीत्या उभी राहणारी जड व हलकी वाहने ही अपघातांचे प्रमुख कारण ठरत असून, रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, लातूर, जिल्हा पोलीस, महामार्ग पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) तसेच संबंधित विभागांच्या संयुक्त विद्यमानाने ही मोहीम राबविण्यात आलेली आहे. या मोहिमेंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्र. NH-361 (उजणी -लातूर -टोल प्लाझा आष्टा- माळेगाव ), NH-63 (लातूर-मुरूड, नळेगाव-टाकळी (देगलूर रोड)), NH-548B (किल्लारी- औसा टी पॉईंट, लातूर-लखमापूर), NH752K (निलंगा-औराद) तसेच लातूर शहर परिसरातील राष्ट्रीय महामार्ग या मार्गांवर विशेष तपासणी व कारवाई करण्यात येत आहे.

या मोहिमेत मा. जिल्हाधिकारी लातूर, मा. पोलीस अधीक्षक लातूर व मा.प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय महामार्गांवरील अवैध पार्किंगविरोधात संबंधित विभागांमार्फत वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. यासोबतच संबंधित वाहनचालक व मालकांना वाहने सुरक्षित व अधिकृत पार्किंग स्थळी उभी करण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत.

मा.प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी सर्व वाहनचालकांना आवाहन केले आहे की, राष्ट्रीय महामार्गांवर कोणत्याही परिस्थितीत अवैध पार्किंग करू नये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मोटार वाहन कायदा व इतर संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल.

------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi