Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लातूर : किरण सगर खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात; अन्य आरोपींचा शोध सुरू

लातूर : किरण सगर खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात; अन्य आरोपींचा शोध सुरू

लातूर, 30 ऑगस्ट (हिं.स.)। विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वासनगाव पाटी परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले.

या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६१५/२०२६, कलम १०३(१), १८९(२), १९०, १९१(२), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कार्यरत होते. पथकाने वासनगाव पाटी परिसरात सापळा रचून बालाजी मोतीराम मस्के (वय ४४, रा. बौद्धविहाराच्या पाठीमागे, बाभळगाव, ता. जि. लातूर) आणि बालाजी हनुमंत फिस्के (वय ३४, व्यवसाय व्यापार, रा. महाराणा प्रताप नगर, लातूर) या दोघांना ताब्यात घेतले आहे.

प्राथमिक चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११.४५ वाजता बाभळगाव नाक्याकडे जाणाऱ्या रिंग रोडवरील यशोदिप हायड्रोलिक दुकानासमोर मयत किरण कालिदास सगर याच्यावर पाच जणांनी मिळून लाठी-काठ्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या किरण सगर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणातील फरार आरोपी किशोर मस्के व इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकाकडून पुढील तपास व कारवाई सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi