Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लातूर मनपाची करदात्यांना मोठी भेट; व्याजावर १०० टक्के सवलत

लातूर मनपाची करदात्यांना मोठी भेट; व्याजावर १०० टक्के सवलत

लातूर, 04 जुलै (हिं.स.)। लातूर शहर महानगरपालिकेने थकीत करदात्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला असून, दि. ६ जुलै ते २० जुलै २०२६ या कालावधीत थकीत मालमत्ता कराचा एकरकमी भरणा करणाऱ्या नागरिकांना व्याजशास्तीमध्ये १०० टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे.

महानगरपालिकेकडून थकीत कर वसुलीसाठी वेळोवेळी आवाहन करण्यात येत असून, शहरातील अनेक मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात कर थकबाकी आहे. नागरिकांकडून व्याजात सवलत देण्याची मागणीही सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर कर वसुलीस गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

महापौर जयश्रीताई सोनकांबळे, उपमहापौर स्नेहल उटगे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, सभागृह नेते विजयकुमार साबदे आणि विरोधी पक्षनेते देविदास काळे यांनी प्रशासनाला व्याजात सवलत देण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार नूतन आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी ६ ते २० जुलै या कालावधीत थकीत कराचा एकरकमी भरणा करणाऱ्या नागरिकांना व्याजशास्तीमध्ये १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

या विशेष सवलतीचा लाभ घेऊन नागरिकांनी आपला थकीत कर महानगरपालिकेकडे तातडीने भरावा, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi