लातूर, 23 ऑगस्ट, (हिं.स.)। लातूर येथे जिल्हा प्रशासन, जिल्हा उद्योग केंद्र आणि 'मैत्री' कक्षाच्या वतीने २४ ऑगस्ट २०२६ रोजी एनरायज बाय हॉटेल सयाजी येथे 'डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट' (District Investment Summit) चे आयोजन करण्यात आले आहे.
'ईझ ऑफ डुइंग बिझनेस' (Ease of Doing Business) आणि 'सिंगल विंडो' पद्धतीद्वारे सर्व परवानग्या एकाच छताखाली देऊन गुंतवणूकदारांना पूर्ण सहकार्य करण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे, असे लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

