Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटाची घोषणा; गाजलेल्या प्रकरणाचा होणार भंडाफोड ?

'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटाची घोषणा; गाजलेल्या प्रकरणाचा होणार भंडाफोड ?

कोल्हापूर, 28 मे (हिं.स.) : समाजात घडणाऱ्या घटनांचे पडसाद अनेकदा रुपेरी पडद्यावर उमटताना दिसतात. वास्तव घटनांवर आधारित चित्रपटांमधून समाजातील अनेक अप्रकाशित पैलू समोर येतात. अशाच धक्कादायक आणि चर्चित प्रकरणावर आधारित असल्याचा दावा करणाऱ्या 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून, हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जैन फिल्म प्रोडक्शन आणि मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती देवेंद्र भट, सुर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे यांनी स्वीकारली आहे. वास्तवदर्शी कथानकावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वरूप बी. सावंत करणार आहेत.

'आता सगळं उघड होणार...!' ही चित्रपटाची टॅगलाईन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटातून अनेकांचा पर्दाफाश होणार असल्याचे संकेत मोशन पोस्टरमधून देण्यात आले आहेत. पोस्टरमध्ये एक पाठमोरी व्यक्ती दिसत असून, तिच्या हातात 500 रुपयांच्या नोटांचे बंडल आहे. कुर्ता-पायजमा आणि जॅकेट परिधान केलेल्या या व्यक्तीभोवती क्राईम सीनच्या पिवळ्या फिती दिसतात. भिंतीवरील फोटोंवर 'नाशिक' आणि 'भोंदूबाबा' असे उल्लेख असून काही ठिकाणी प्रश्नचिन्ह दाखवण्यात आले आहे.

तसेच पोस्टरमध्ये तांब्याचे भांडे, पुस्तके, चहाचा ग्लास आणि 'एलिश हनी' यांसारख्या वस्तूंचा समावेश असल्याने हा चित्रपट कोणत्या चर्चित प्रकरणाशी संबंधित आहे, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

चित्रपटाची कथा आणि कलाकारांची नावे सध्या गुप्त ठेवण्यात आली असून, लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. चित्रपटाची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहिली असून पटकथा आणि संवाद संजय नवगिरे यांनी तयार केले आहेत. आकाश काकडे हे चित्रपटाचे छायांकन करणार असून कला दिग्दर्शनाची जबाबदारी अक्षय आंबेकर यांच्याकडे आहे. वेशभूषा आकांक्षा गांधी यांनी केली असून सचिन घणवंत प्रोडक्शन हेड म्हणून काम पाहणार आहेत. नेहा घोडके प्रॉडक्शन कंट्रोलर म्हणून कार्यरत आहेत.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi