Dailyhunt
महर्षी चित्रपट संस्थेच्या वतीने चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांची जयंती साजरी

महर्षी चित्रपट संस्थेच्या वतीने चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांची जयंती साजरी

नाशिक, 30 एप्रिल, (हिं.स.)। महर्षी चित्रपट संस्थेच्या वतीने सातत्याने नऊ वर्षा पासून दादासाहेब फाळके यांची जयंती साजरी करून पर्यावरण जनजागृती व नव्याने विकसित होत असलेल्या कलाकृती सादरीकरण अर्थात लघुपट महोत्सव आयोजित करत आहे..

गेल्या नऊ वर्षा मध्ये मराठी, हिंदी,चित्रपट टेलिव्हिजन मालिकेतील कलाकार यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करून पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे.

चित्रपट बनवताना अनेकांचे योगदान त्यासाठी राहते लक्षात राहतात ते नायक , नायिका याच्या पलीकडे जात महर्षी चित्रपट संस्थेने पडद्या मागील कलाकारांना समोर आणून पुरस्कार देखिल देण्यात आलेले आहे.

संस्थेचे हे दहावे वर्ष असल्याने भविष्यात दादासाहेबांची जयंती प्रशासनाला सोबत घेऊन दादासाहेब फाळके स्मारकात साजरी करण्यात येईल तसेच चित्रपट सारखा हजारो कोटीचा व्यवसाय उभा राहिला त्या हजारो लोकांना व्यवसाय व रोजगार उपलब्ध करून दिला चित्रपट क्षेत्रात करोडो रुपयांचा व्यवसाय करुन मोठा उद्योग उभा करणाऱ्या अशा या उद्योजक दादासाहेब फाळके यांच्या नावांनी उद्योग विकास दिन साजरा केला जावा असे संस्थेचे अध्यक्ष निशिकांत पगारें यांनी मागणी करण्यात आली. नदीचा उगम हा छोटा असतो परंतु समुद्राला मिळताना तो मोठा होता .आमची गोदावरी त्र्यंबकेश्वर येथे अत्यंत छोट्या स्वरूपात असली तरी ती राजमहेंद्री (आंध्रप्रदेशात) सप्तधारांनी समुद्रात जाते तर पूर्व पश्चिम गोदावरी जिल्हे तिच्या दोन तीरावर आहे असेच दादासाहेब फाळके यांचे कार्य असून नाशिक मध्ये सुरू झाले आज प्रचंड आर्थिक उलाढालीचे केंद्र आहे परंतु दादासाहेबांचा त्यांच्याच जन्मभूतील लोकांना विसर पडला ही शोकांतिका आहे असे उद्योजक मा.सुनील मेंढेकर यांनी सांगितले.

महर्षी चित्रपट संस्था आयोजित लघुपट महोत्सव 2026 चे या लघुपट महोत्सवास संपूर्ण महाराष्ट्रातून लघुपट आलेले आहे त्यांचा स्क्रिनिंग कार्यक्रम 2 मे 2026 व 3 मे 2026 रोजी सकाळी 10.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत हुतात्मा स्मारक जिल्हा न्यायालयासमोर सि बि एस नाशिक येथे असणार आहे या लघुपट महोत्सवाला नाशिककरांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi