Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महाविद्यालयीन तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्यासाठी विशेष मोहिमेची मागणी

महाविद्यालयीन तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्यासाठी विशेष मोहिमेची मागणी

Hindusthan Samachar 0 months ago

कोल्हापूर, 28 मे (हिं.स.) : भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले.

राज्यातील प्रमुख शैक्षणिक शहरांमध्ये, विशेषतः मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर येथे 'एम.डी.' तसेच इतर सिंथेटिक ड्रग्जचा वाढता प्रादुर्भाव गंभीर चिंतेचा विषय बनला असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हा विषय केवळ कायदा-सुव्यवस्थेपुरता मर्यादित नसून 'नार्को-टेररिझम'शी संबंधित राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचेही सांगण्यात आले.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने राज्यव्यापी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात पुढील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत -

• अँटी-नार्कोटिक्स विभागाकडून महाविद्यालयीन मोहिमेसाठी विशेष नोडल ऑफिसर नियुक्त करणे.

• प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी 'दामिनी कॅम्पस अॅम्बेसेडर' नियुक्त करणे.

• विद्यार्थिनींसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने आत्मरक्षण प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे.

• 'ड्रग्ज आणि नार्को-टेररिझम' विषयावर महाविद्यालयांमध्ये जनजागृती सत्रे घेणे.

• पालकांसाठी मार्गदर्शन व समुपदेशन सत्रांचे आयोजन करणे.

• युवकांना सकारात्मक दिशा देण्यासाठी क्रीडा स्पर्धा व क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणे.

पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद देत विषय गांभीर्याने विचारात घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

--------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi