Dailyhunt

मराठवाडा विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रासाठी उपमुख्यमंत्री पवारांकडे निधीची मागणी

बीड, 30 एप्रिल (हिं.स.)।

डॉ. बाबासाहेब

आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राला वर्षभरापूर्वी २५ एकर जमीन शासनाने दिली. मात्र, हे केंद्र कधी कार्यान्वित करणार हा प्रश्न होता.

यासाठी निधी उपलब्ध करून हे केंद्र कार्यान्वित करावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे करण्यात आली.

याबाबत विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांनी सुनेत्रा पवार यांचीभेट घेऊन विद्यापीठाचे कौशल्य विकास केंद्र-अंबाजोगाई येथे कार्यान्वित करण्याची मागणी केली. अजित पवार यांनी पुढाकार घेत २५ एकर जागा विद्यापीठाला हस्तांतरित केली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कौशल्याधारीत व रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपलब्ध होईल, या उद्देशाने राज्य शासनाकडे प्रस्तावही सादर केलेला आहे. आता त्यासाठी निधी उपलब्ध करून हे केंद्र कार्यान्वित करावे, अशी मागणी केली. मराठा समाजातील विद्यार्थी एनएमएमएस ही शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले. परंतु, केंद्र सरकारची शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांना (२०२१) पासून सारथी संस्थेच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात येत होती.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi