Tuesday, 04 Aug, 4.40 pm Hindusthan Samachar

मुख्य बातमी
'मेक इन इंडिया' धोरणास मिळालेल्या चालनेमुळे अभियांत्रिकी उपकरण क्षेत्रात भरीव वाढ होणार; गोदरेज अँड बॉइसचे निरीक्षण

मुंबई, ४ ऑगस्ट, (हिं.स) : गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या गोदरेज अँड बॉइस कंपनीने अचूकतेसह बनवण्यात आलेल्या अभियांत्रिकी उपकरणांच्या मागणीत वेगाने वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. देशाच्या 'मेक इन इंडिया' चळवळीने जोर पकडल्यामुळे गरजेनुसार बनवल्या जाणाऱ्या अभियांत्रिकी यंत्रणा आणि उपकरण क्षेत्रात वाढीच्या मुबलक संधी निर्माण होणार आहेत.

गेल्या 20 वर्षांपासून न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची (एनपीसीआयएल) धोरणात्मक भागीदार असलेली गोदरेज प्रीसिजन इंजिनियरिंग कंपनी एनपीसीआयएलला काक्रापार अटॉमिक पॉवर प्लँट - 3 साठी सर्वात महत्त्वाचे उपकरण - देशांतर्गत तयार करण्यात आलेले पहिले 700 एमडब्ल्यूई प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअक्टर्स (पीएचड्ब्लूआर) पुरवण्यात सहभागी होते व नुकतीच त्याची अंमलबजावणी करण्यात आली.

गोदरेज प्रीसिजन इंजिनियरिंगने काक्रापार अटॉमिक पॉवर प्लँट - 3 साठी फ्युएलिंग मशिन ब्रिज आणि कॅरेज पाठवले असून ते औण्विक उर्जा रिक्टरच्या महत्त्वाच्या भागत बसवण्यात आले आहे.

10 नव्या 700 मेगावॉट औण्विक उर्जा प्रकल्पांना मंजुरी मिळाल्यामुळे डिझाइन, अभियांत्रिकी, उत्पादन यांचा संबंधित अनुभव असलेल्या, लक्षणीय वैज्ञानिक ज्ञान व तांत्रिक कौशल्य बाळगणारे स्पर्धात्मक व बांधील भागीदार सरकारच्या 'आत्म- निर्भर' उपक्रमातील महत्त्वाच्या घटकांपैकी एक असतील.

'गेल्या 50 वर्षांपासून आम्ही गोदरेज अँड बॉइसमध्ये मजबूत अभियांत्रिकी आणि मशिन उभारणी क्षमतांच्या विकासासाठी गुंतवणूक करत आहोत तसेच भारतीय संस्थांशी भागिदारी करत औण्विक उर्जा व संरक्षण क्षेत्रासारख्या महत्त्वाच्या धोरणात्मक क्षेत्रांना जटील उपकरणे पुरवत आहोत,' असे गोदरेज अँड बॉइसचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. जमशेद एन गोदरेज म्हणाले.

'मिशनसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या यंत्रणा तसेच डिझाइन, उत्पादन आणि चाचणीसाठीच्या इंटिग्रेटेड फ्रेमवर्कमधील आमचा प्रदीर्घ अनुभव भारताच्या औद्योगिक स्वावलंबनाच्या दिशएने सुरू असलेल्या प्रवासाला वेग देईल,' असेही श्री. गोदरेज म्हणाले.

'नाविन्यपूर्ण संशोधन आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या आमच्या क्षमतेमुळे आम्हाला ग्राहकांशी भागिदारी करण्यास मदत झाली व पहिल्यांदाच 'मेक इन इंडिया' उपकरण तयार करण्यात आले,' असे गोदरेज अँड बॉइसच्या औद्योगिक उत्पादने समूहाचे मुख्य ऑपरेटिंग अधिकारी कौस्तुभ शुक्ला म्हणाले.

गोदरेज प्रीसिजन इंजिनियरिंगद्वारे औण्विक उर्जा, संरक्षण क्षेत्रासाठी जमिनीवर आधारित आणि नौदल यंत्रणा त्याचप्रमाणे स्टील आणि पवन उर्जा अशा क्षेत्रांतील महत्त्वाच्या मिशनमधील वापरासाठी गुंतागुंतीच्या आणि प्रभावी यंत्रणांसाठी लागणारी उपकरणे गरजेनुसार खास बनवली जातात. औण्विक उर्जा उपकरणांशिवाय व्यावसायिक युनिटद्वारे ब्राम्होस मिसाइल क्षेपणास्त्र, मिसाइल वाहक, डायव्हिंग आणि सरफेसिंग यंत्रणांसारख्या नौदल यंत्रणा, जहाच्या मुख्य भागातील उपकरणे, लाइफ राफ्ट कंटेनर इजेक्शन यंत्रणा, स्टियरिंग गियर आणइ अशा प्रकारच्या कंत्राटांची अंमलबजावणी केली जाते.

खास तयार करण्यात आलेले प्रत्येक उपकरण आमच्या ग्राहकांसाठी दर्जाचे कठोर नियम पाळत, उच्च अचूकतेसह विकसित, उत्पादित केले जाते व त्याच नियमांनुसार त्याची चाचणी घेतली जाते.

गोदरेज अँड बॉइस मॅन्युफॅक्चरिंग कं. लि :

1897 मध्ये गोदरेज अँड बॉइस (जी अँड बी) या गोदरेज समूहाच्या कंपनीची स्थापना झाली होती आणि तिने उत्पादनाच्या माध्यमातून भारताच्या स्वावलंबनाच्या प्रवासात मोठे योगदान दिले आहे. जी अँड बीकडे जगातील पहिल्या स्प्रिंग नसलेल्या कुलुपाचे पेटंट असून तेव्हापासून कंपनीने सुरक्षा, वित्त, एयरोस्पेस आणि संरक्षण अशा 14 क्षेत्रांत प्रवेश केला आहे. गोदरेज हा भारतातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड असून त्याद्वारे दररोज जगभरातील 1.1 अब्ज ग्राहकांना सेवा दिली जाते.

हिंदुस्थान समाचार

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi
Top