Thursday, 07 Feb, 6.40 am Hindusthan Samachar

मुख्य बातमी
मिळकतीच्या जीएसआय मॅपिंगचे काम अर्धवट

पुणे, 7 फेब्रुवारी (हिं.स.) पुणे महापालिकेने शहरातील सर्व मिळकतींचे जीएसआय मॅपिंग करण्याचे काम खाजगी कंपन्याना दिले होते. या कंपन्यांनी हे काम पुर्ण केल्याचा दावा केला आहे. मात्र मिळकतीच्या वापरामध्ये झालेला बदलाबाबतची माहिती केवळ पालिकेला अर्धीच देण्यात आली आहे. त्यामुळे या कंपन्यांना मुदत वाढ देउनही हे काम अपुर्ण राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेने दोन कंपन्यांना शहरातील सर्व मिळकतींचे जीएसआय मॅपिंग करण्याचे काम दिले होते. त्यात ८ लाख ज्ञात व सुमारे २ लाख अज्ञात मिळकतींचे सर्वेक्षण करून मिळकतकरात सुमारे ५०० कोटींची वाढ अपेक्षित होती. हिंदुस्थान समाचार
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi
Top