Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

मिशन ग्रीन मान्सूनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वृक्षांचे वाटप; 'हरित नाशिक, समृद्ध नाशिक' संकल्पनेला बळ

नाशिक, 01 ऑगस्ट (हिं.स.)।

: उन्नत नाशिक अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या 'मिशन ग्रीन मान्सून - हरित नाशिक, समृद्ध नाशिक' या उपक्रमाच्या सहाव्या टप्प्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आज मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिककरांना वृक्षांचे वाटप करण्यात आले.

पर्यावरण संवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या अभिनव उपक्रमात नागरिकांनी क्यूआर कोडद्वारे वृक्षांची नोंदणी केली असून, त्या मागणीनुसार प्रशासनामार्फत प्रभागनिहाय घरपोच वृक्ष उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नागरिकांना त्यांच्या दारातच वृक्ष उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये नवा आदर्श ठरत आहे.

या अभियानांतर्गत आतापर्यंत ३ हजार ५५० वृक्षांचे वितरण करण्यात आले असून, २ ऑगस्ट रोजी उर्वरित ४ हजार ८५० वृक्षांचेही प्रभागनिहाय घरपोच वितरण करण्यात येणार आहे.

यावेळी सेवासदन येथील निवासस्थानी कुसमाडी पॅटर्नच्या धर्तीवर राबविण्यात येणाऱ्या वृक्षलागवड व संवर्धन उपक्रमाचे अनावरण करण्यात आले. अधिकाधिक नागरिकांनी वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारावी आणि 'हरित नाशिक, समृद्ध नाशिक' ही संकल्पना साकार करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. या प्रसंगी महापौर हिमगौरी आडके, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, मनोज साठे, राजेश पंडित, शेखर जगताप, चिन्मय उदगीरकर, चंदू पाटील यांच्यासह पर्यावरणप्रेमी, स्वयंसेवक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

'मिशन ग्रीन मान्सून'च्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाची व्यापक जनजागृती होत असून, नाशिक शहर अधिक हरित, स्वच्छ आणि पर्यावरणस्नेही बनविण्याच्या दिशेने हा उपक्रम प्रभावी पाऊल ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi