Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पुण्याच्या शिवम जाधवची बाजी

मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पुण्याच्या शिवम जाधवची बाजी

त्नागिरी, 30 ऑगस्ट (हिं.स.) । येथील मृणाल हेगशेट्ये स्मृती राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत पुण्याच्या शिवम जाधवने प्रथम क्रमांक पटकावत मानाचा किताब मिळवला. जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन गटात राधा समीर पाटणकर, माध्यमिक मराठी गटात संस्कृती शांताराम कोकरे, तर इंग्रजी माध्यम गटात ग्रीष्मा अजित नोंदोस्कर यांनी प्रथम क्रमांक पटकावले.

तब्बल १५६ विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे झालेल्या या स्पर्धेला वक्तृत्वाचा जणू उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले. कनिष्ठ महाविद्यालयीन गटाचा सांघिक चषक नवनिर्माण महाविद्यालयाने, तर वरिष्ठ महाविद्यालयीन गटाचा सांघिक चषक एसकेएसव्ही कॉलेज, लांजा यांनी पटकावला.

मृणाल हेगशेट्ये वक्तृत्व स्पर्धेला चार दशकांची परंपरा लाभली आहे. ज्वलंत व निर्भीड विषय, पारदर्शक निकाल आणि राज्यभरातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे या स्पर्धेने महाराष्ट्रात आपला वेगळा नावलौकिक निर्माण केला आहे. यंदा पुणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर, सांगली, संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

स्पर्धेतील गुणानुस्रमे विजेते असे - राज्यस्तरीय वरिष्ठ महाविद्यालयीन गट - शिवम संदीप जाधव (पुणे विद्यापीठ) , अनिकेत रामा वनारे (जेधे महाविद्यालय पुणे), अभय कृषिकांत आळशे (मुंबई विद्यापीठ), भगवंत रामचंद्र कोळी (कला वाणिज्य महाविद्यालय वारजे, माळवाडी, पुणे), आणि एसकेएसव्ही कॉलेज, लांजा अथर्व विवेक पाध्ये. या गटाचा सांघिक चषक लांजा कॉलेजने पटकावला.

जिल्हास्तरीय माध्यमिक मराठी गटात नवनिर्माण हायची संस्कृती शांताराम कोकरे, फाटक हायस्कूलची तपस्या गुरुप्रसाद बोरकर, केंद्रीय नवोदय विद्यालय, पडवे येथील आर्या उदय यादव, डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूलची देवता प्रमोद पाटील आणि मीनाताई ठाकरे हायस्कूल, साडवलीची पंकजा उत्रेश्वर गीते या दोघींना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

इंग्रजी माध्यम माध्यमिक गट - एसव्हीआयसीटी इंग्लिश मीडियम स्कूल, कासारवाडीची ग्रीष्मा अजित नोंदोस्कर, नवनिर्माण हाय, रत्नागिरीची आफ्रा मुदस्सर डिंगणकर, संतोष भाई मेहता स्कूल, दापोलीची जान्हवी काशिराम देवघरे तृतीय, नवनिर्माण हायची तीर्था संदीप नाखरेकर, संतोष भाई मेहता स्कूल, दापोलीची रिद्धी दत्ताराम चौगले.

जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन गटात अभ्यंकर-कुलकर्णी कॉलेज, रत्नागिरीची राधा समीर पाटणकर, नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरीची विधी सत्यजित कापडी, अण्णासाहेब बेहरे कॉलेज, लवेल-खेडचा नीरज प्रफुल तलाठी, वि. स. गांगण ज्युनिअर कॉलेज, रत्नागिरीची बिल्वा गणेश रानडे, ज्ञानदीप कॉलेज, बोरज-खेडची श्रेया कृष्णा मेस्त्री. या गटाचा सांघिक चषक नवनिर्माण महाविद्यालयाने पटकावला.

स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार तथा राजापूरच्या नगराध्यक्षा हुस्नबानू खलिफे यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरण आयबीएन चॅनलचे संपादक मंदार फणसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, संचालक डॉ. अलिमिया परकार, संचालिका सीमा हेगशेट्ये आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi