Dailyhunt

मुदखेड येथे ६ एप्रिलला विराट धर्मसभेचे आयोजन

नांदेड, 04 एप्रिल (हिं.स.)।

मुदखेड येथे श्री राम जन्मोत्सव व शिवजन्मोत्सव निमित्त भव्य शोभा यात्रेचे ६ एप्रिल रोजी सोमवारी आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २ वाजता हि शोभा यात्रा ब्राम्हण गल्लीतीलचौमुखी गणपती जवळील श्री राम मंदीरा पासुन काढण्यात येणार आहे.

मोंढा मैदानावर यात्राचे रूपांतर धर्म सभेत होईल. विराट धर्म सभा सायंकाळी ७ वाजता आयोजीत केली आहे. गणपती मंदिर मोंढा मैदान येथील धर्म सभेत यंदा प्रमुख वक्ते धर्मवीरश्री डॉ. गौतमजी खट्टर हे आहेत. शोभायात्रेत अनेक देखावे असतील. श्री संजीवनी भजनी मंडळ नांदेड यांचा

विशेष सहभाग असेल. असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत तरी सर्व हिंदू बांधवांनी हजारोच्या संख्येने जन्मोत्सव शोभायात्रेत व विराट धर्मसभेत सहभागी व्हावे असे आवाहन समस्त हिंदू जन्मोत्सव आयोजन समिती व हनुमान चालीसा समिती मुदखेड यांचे कडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi