Saturday, 08 Aug, 5.26 pm Hindusthan Samachar

मुख्य बातमी
नगर : अघोषित खासगी शाळांचा निधी व अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

अहमदनगर, 8 ऑगस्ट (हिं.स.):- महाराष्ट्र राज्यातील अघोषित खाजगी प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदानास पात्र घोषित करावे,पात्र घोषित शाळांना निधीची तरतूद करावी व २० टक्के अनुदानित शाळांना प्रचलित प्रमाणे वाढीव अनुदान मिळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात आश्‍वासन देवूनही त्याची पुर्तता होत नसल्याने संघटनेच्या वतीने स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट ला प्रतीकात्मक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन नगर तहसिल कार्यालयात देण्यात आले.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास पालवे,अनिल गायकवाड,विठ्ठलप्रसाद तिवारी, अंबादास मिसाळ, बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते. राज्यातील अनुदानास पात्र अघोषित खाजगी प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा निधीसह घोषित करणे,अनुदानास पात्र घोषित २० टक्के अनुदानित शाळांना प्रचलित धोरणानुसार अनुदानाचा वाढीव टप्पा लागू करण्या बाबतचा विषय गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहे.या विषया संदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत २२ जून रोजी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार,शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, यांनी शिक्षकांच्या शिष्टमंडळ समोर कॅबिनेट बैठकीत आपला प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते.तेव्हापासून आजवर झालेल्या चारही कॅबिनेटच्या बैठकीकडे सर्व शिक्षक बांधव मोठ्या आशेने अनुदानाचा प्रश्‍न निकाली निघेल या आशेने पाहत आहे.मात्र गेल्या महिन्याभरात सदर विषय मार्गी न निघाल्याने शिक्षकांचा संयम सुटत चालला असून,या बाबतीत शिक्षकांच्या भावना तीव्र आहेत.लवकरात लवकर शासनाने शिक्षकांना दिलेले आश्‍वा सन पाळून राज्यातील अघोषित खाजगी प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदानास पात्र घोषित करावे,राज्या तील अनुदानास पात्र घोषित शाळांना निधीची तरतूद करावी, राज्यातील २० टक्के अनुदानित शाळां ना प्रचलित प्रमाणे वाढीव अनुदान मिळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.तर या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,शालेय शिक्षण मंत्री व राज्य शालेय शिक्षण मंत्री यांना पाठविण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi
Top