Tuesday, 04 Aug, 4.46 pm Hindusthan Samachar

मुख्य बातमी
नगर : विलगीकरण कक्षातील नागरिकांना दोन्ही वेळचे भोजन

अहमदनगर, 4 ऑगस्ट (हिं.स.):- लॉकडाऊनच्या काळात रोजंदारीवर काम करणारे मजूर,परप्रांतीय,गोरगरिब यांना महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज दोन वेळेचे जेवणाचे डबे पुरविणार्‍या युवक काँग्रेस,एनएसयूआय,जयहिंद युवामंच व राजवर्धन फाऊंडेशनच्या वतीने कोविड १९ संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या सर्व नागरिकांसाठी दोन वेळेचे उच्च प्रतीच्या जेवणाची सुविधा उपलब्ध करुन दिली जात अस ल्याची माहिती एनएसयूआयचे अध्यक्ष निखील पापडेजा यांनी दिली आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व राजकीय पक्ष,सहकारी संस्था,सेवाभावी संस्था एकवटल्या आहेत.युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेस, एनएसयूआय,राजवर्धन फाऊंडेशन,जयहिंद युवा मंचच्या वतीने कोरोना तपासणी झालेले व सध्या संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या सर्व नागरिकांना दररोज चहा,ना ष्टा व उच्च प्रतीचे दोन वेळेचे जेवण पुरविले जात आहे.कोरोनाच्या प्रार्श्‍वभूमीवर तालुक्यात रॅपीड टेस्ट सुरु असून १ रुग्णासोबत २० लोकांच्या तपासण्या होत आहे.त्यामुळे विलगीकरण कक्ष ही वाढविण्यात आले आहे.नगरपालि केच्या वतीने कॉटेज हॉस्पीटल व मौलाना आझाद मंगल कार्यालय,ग्रामीण रुग्णालय,कॉटेज हॉस्पीटल,सिध्दकला हॉस्पीटल,अमृतवाहिनी हॉस्टेल येथील विलीगीकरणात असलेल्या नागरिकांना सेवाभावीव्रताने ही भोजन व्यव स्था पुरवि ली जात आहे.मागील तीन महिन्यांपासून नविनभाई शहा मंगल कार्यालय येथील अन्नछत्रातून पहिले दोन महिने २५०० तर मागील महिन्यापासून १५०० नागरिकांना दररोज दोन वेळेचे उच्च प्रतीचे जेवण युवक काँग्रेस व एनएस यूआय,जयहिंद युवा मंच व राजवर्धन फाऊंडेशनचे युवक पुरवित आहे.सध्या विलीगीकरण कक्षातील सुमारे ५०० नागरिकांना हे जेवणाचे डबे पुरविले जात आहे.हा तरुणांचा एक स्तुथ्य उपक्रम असून या युवक संघटनाच्या कामाचे सर्वत्र कौतूक होत आहे. हिंदुस्थान समाचार

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi
Top